धक्कादायक ! विनाकारण फिरणारे 7 पॉझिटिव्ह

विनाकारण फिरणाऱ्याची देवरी चिचगड चौकात कोरोना चाचणी 7 व्यक्ती निघाले पॉझिटिव्ह

डॉ. सुजित टेटे

देवरी 21: राज्यात वाढत्या कोरोनाचे प्रमाण बघता कोरोना नियंत्रनात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून देवरी येथील चिचगड चौकात आतापर्यंत 47 लोकांचे टेस्टिंग करण्यात आले असून त्यापैकी 7 लोकांचे नमुने पॉझिटिव्ह आले असून त्यांची रवानगी देवरी च्या कोविड केंद्रात करण्यात आली आहे.

सदर चाचण्या देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

Print Friendly, PDF & Email
Share