प्रवासी निवारा मध्ये एका इसमाचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू
प्रहार टाईम्स
ब्रह्मपुरी : संपूर्ण देशामध्ये करोना च्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून ब्रह्मपुरी येथील रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णाला भरती करण्यासाठी बेड व इतर सामग्रीच्या अत्यंत तुटवडा भासत आहे त्यातच ब्रह्मपुरी शहरातील की ख्रिस्तानंद चौक येथील प्रवासी निवारा मध्ये एका इसमाच्या उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे .
मृतक उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे आला असता रुग्णालयात भरती होण्याआधी त्यांना मृत्यू आला सदर इसम हा नातेवाईकांसोबत ब्रह्मपुरी ला भिवापूर तालुक्यामधून आंभोरा गावांमधून आला होता असे बोलले जात आहे .सदर वृत्त लिहीपर्यंत मृतक इसमाचे नाव अद्यापही करू शकले नाही.