गोंदिया २: अमरावती जिल्हातील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपवन संरक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचा सर्व स्तरावर निषेध केला जात आहे. याचप्रसंगी १ एप्रिल ला रेंजर फ़ॉरेस्ट असोशिएसन महाराष्ट्र व वन संरक्षक वनपाल संघटना नागपुर विभाग गोंदिया च्या वतिने काळी फित लावुन श्रद्धांजलली वाहिली गेली असुन दोषीवर कठोर कारवाई व्हावी व दीपाली चव्हाण यांना न्याय मिळावा अशी निषेध करत मागणी केली.
यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष शैलेंद्र भदाडे, जिल्हाध्यक्ष डीडी मेश्राम, विवेक अवस्थी,विरेंद्र येलमे,प्रवीण केलवतकर, कल्याणी खोब्रागड़े,सुरेशा शिवनकर, नरेंद्र पाथोड़े, जिया खान, गोंदिया वन विभाग के आरएफ़ओ सुनील नानवटे, एन एस पाथोड़े, एएम साबले, के के लिल्हारे उपस्थित होते.








