सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत नरहरी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


प्रहार टाईम्स | भुपेन्द्र मस्के

सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरपुर/भागी येथे दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिरपुर ( नरहरी महाराज मंदिर परिसर) २८ फेब्रुवारी २०२१: सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त शिरपुर/ भागी येथे पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सरपंच धनराज कोरोंडे, अजय ढोमणे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी कुरसुंगे महाराज यांचे हरिपाठ व रमेशजी गिरी महाराज यांचे जाहिर किर्तन पार पडले. आज कोरोनाचे नियम पाळुन मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.मनोहर मस्के प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मन सोनसर्वे,सुरेश भजे, हरिभाऊ कोरोंडे, आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्त सुधाकर मस्के यांचे हस्ते अंबिका बंजार यांचे उपस्थितीत गोपाल काला पार पडला. महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमांना परिसरातील सुवर्णकार समाजाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें