गरजूंना ब्लॅकेट तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Deori: जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कन्हाळगाव पंचायत समिती देवरी जिल्हा गोंदिया येथे दि.१५ डिसेंबर २०२५ रोज सोमवारला लायन्स क्लब देवरीच्या वतीने तसेच पोलीस स्टेशन देवरी संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य व शैक्षणिक साहित्य व गरजू महिलांना ब्लँकेट चे वाटप करण्यात आले त्यात गावातील महिला उपस्थित होत्या सदर कार्यक्रम जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कन्हाळगांव प्रांगणात घेण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष समिताताई कटरे सरपंच कन्हाळगाव दीपप्रज्वलक गीता मुळे मॅडम पीएसआय देवरी, प्रमुख उपस्थिती रेखाताई कुरसुंगे उपसरपंच, लिनेस क्लब देवरीच्या पदाधिकारी उपस्थित होते. बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप व महिलांना ब्लँकेट वाटप केले. कार्यक्रमाचे संचालन रिता वंजारी तर आभार गीता चौधरी यांनी केले.

विविध विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले जसे महिला आत्मनिर्भर कशा होतील याबद्दल व गुड टच बॅड टच याविषयी तसेच सविस्तर स्पर्धा परीक्षा कशा द्याव्यात व कसा अभ्यास करावा याचे मार्गदर्शन गीता मुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी डॉ. सुजाता ताराम आरोग्य अधिकारी प्राथमिक केंद्र मुल्ला यांनी महिलांना स्त्रीभ्रूणहत्या व योगासनावर माहिती दिली. वाचनाच्या पुस्तका त्यांनी शाळेला भेट दिल्या. गरजू महिलांना व थंडीत कुळकुळणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वेटर चे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे पोलीस विभाग देवरी यांनी दादलोरा एक खिडकी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अभ्यास उपयोगी साहित्य देऊन त्यांना हातभार लावला. सदर कार्यक्रमाला डी बी लांजेवार उच्च श्रेणी मुख्याध्यापक अरुण जाधव सहाय्यक शिक्षक सलामे कु. गीता चौधरी सहाय्यक शिक्षिका हेमलता बहोरे सहाय्यक शिक्षिका,मोरेश्वर चनाप सहाय्यक शिक्षक व गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर होता कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें