प्रहार टाईम्स – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ ते २८ मार्च २०२६ दरम्यान होणार असून दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ ते २८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.
बारावीची प्रायोगिक, श्रवण, तोंडी व आंतरिक मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी २०२६ ते ०९ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान घेतली जाईल. तर दहावीची प्रायोगिक परीक्षा ०२ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन सुलभ व्हावे यासाठी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. अधिकृत विषयनिहाय वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे.









