देवरीत येत्या 28 फेब्रुवारीला “एक शाम मुस्कान देणे वाले के नाम” सोहळा

डॉ. सुजीत टेटे l प्रहार टाईम्स

प्रसिद्ध सत्संग गायिका गिन्नी कौर यांची प्रामुख्याने उपस्थिती

देवरी 09- श्री श्याम मित्र परिवार देवरी यांच्या द्वारा देवरी येथे येत्या 28 फेब्रुवारीला “एक शाम मुस्कान देणे वाले के नाम” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून सादर कार्यक्रमाला पटना च्या प्रख्यात सत्संग गायिका गिन्नी कौर आवर्जुन उपस्थित राहणार असून त्यांच्या सोबतीला श्याम -निखिल राजनंदगाव आणि कुमार योगेश अकोला उपस्थित राहणार असल्याचे श्री श्याम मित्र परिवार देवरी यांनी प्रहार टाईम्स शी बोलतांना संगितले.

“करणे वाला शाम और कराने वाला शाम ” या संकल्पनेवर सदर कार्यक्रमाचे आयोजन देवरी येथील छत्रपती शिवाजी पोलीटेकनिक कॉलेज मध्ये 28 फेब्रुवारी 2021 ला दुपारी 3 वाजता पासून सादर कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या सविस्तर माहिती साठी खलील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधता येणार – 9422817611 , 9422134856, 9923916000, 9421730000 , 8518936000

जास्तीत जास्त उत्सुक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे श्री श्याम मित्र परिवार देवरी यांनी जाहीर आवाहन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share