देवरी: पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे निर्देशानुसार दिनांक १३/०८/२०२५ ते १८/०८/२०२५ पर्यंत जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याने पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग देवरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रविण डांगे यांनी पोलीस स्टेशन हददीतील सिध्दार्थ हॉयस्कुल व जुन्यीअर कॉलेज डवकी, माध्यमिक विदयालय सुरतोली, आदिवासी शासकिय आश्रम शाळा शेंडा, वसंता हॉयस्कुल व ज्यु. कॉलेज डोंगरगाव येथील शाळांना भेटी देवुन अंमली पदार्थ विरोधी जनजागृती शपथ घेवुन शाळेकरी मुलांचे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करुन गावातील मुख्य मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच लोहारा, डवकी येथील गांवाना भेटी देवुन अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली. दिनांक १६/०८/२०२५ रोजी नशेचे प्रकार, परिणाम व त्यावरल इपाय याबाबत मनोहरभाई पटेल व ज्यु. कॉलेज देवरी, कमलादेवी हॉयस्कुल व ज्यु. कॉलेज देवरी येथे वर्ग ०८ ते १० व ११ ते १२ दोन गटात निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. दिनांक १७/०८/२०२५ रोजी नशामुक्ती विषयावर चित्रकलास्पर्धा ब्लॉसम पब्लीक स्कुल देवरी, सी एसपब्लीक स्कुल देवरी येथे घेण्यात येत असुन दिनांक १८/०८/२०२५ रोजी नशेचे साामाजीक परिणाम यावर वसंता हॉयस्कुल व ज्यु. डोंगरगाव येथे पटनाटय चे आयोजन करण्यात आले आहे.








