देवरी: तालुक्यातील सुरतोली गावाजवळील जंगलात वाघाने मेंढीची शिकार केली. स्थानिक रहिवाशांनी आज सकाळी जंगलाच्या कडेला एका वाघाला फिरताना पाहिले. वाघ गावापासून सुमारे १ किलोमीटर अंतराव दिसल्याची प्राथमिक माहिती असून कोणत्याही माणसावर हल्ला केला नाही. मात्र, त्याने एक मेंढी मारल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागान े तातडीन े लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली असून, गावकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








