सावधान ! वाहनांवर आता कॅमेऱ्यांची नजर

नियमभंगास दोन हजारांचा दंड अनिवार्य, ६० पेक्षा अधिक वेग असल्यास चालान

गोंदियाः जिल्ह्यात वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी आणि अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर ओव्हरस्पीड वाहन पकडण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

प्रवासी आणि वाहनचालकांनी गतीमर्यादा ओलांडल्यास किंवा सीटबेल्ट न वापरल्यास कॅमेऱ्यातून थेट चालान जारी होणार असून, दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. हे

वाहनाचा वेग ६० किमी प्रति तासपेक्षा अधिक झाल्यास कॅमेऱ्यातून चालान जारी होईल. चारचाकी चालवताना सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई होईल. वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

नियम शासकीय वाहनांनाही लागू असतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी कळविले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें