सालेकसा : 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यभरातील बँक मित्र आणि बँक सखी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये धरणे आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या आवाहनानुसार हे आंदोलन राज्यभरात पार पडणार आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बँक मित्रांची संख्या 20 हजारांहून अधिक आहे. मात्र त्यांना कोणत्याही सेवाशर्ती लागू नाहीत. बँका कॉर्पोरेट कंत्राटदारांमार्फत बँक मित्रांना अत्यल्प कमिशनवर कामे करायला लावतात. यामध्ये नवीन खाते उघडणे, ठेवी स्वीकारणे, पेमेंट करणे, सरकारी योजनांची अंमलबजावणी यासारख्या अनेक महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत. या कामांसाठी बँक मित्रांना योग्य मोबदला मिळत नाही. करिता संघटनेच्या वतीने बैंक मित्रांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यभरातून सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे कार्यक्रम संघटीत करण्यात येत आहे. हा धरणे कार्यक्रम दि. ०१ मई २०२५ रोज गुरुवारला सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० पर्यंत जिल्ह्या अधिकारी कार्यालय समोर जिल्हा गोंदिया येथे आयोजित करण्यात येत आहे.
मागण्या खालील प्रमाणे,
- बैंक मित्रांना निर्धारित सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात.
- बैंक आणि बैंक मित्र यातीत मध्यस्त यांना दूर सारले जावे.
- बैंक मित्रांना किमान मेहनताना दिला जावा ज्यासाठी त्यांच्याकडून किमान निर्धारित काम करून घेतते जावे व व्यवहारासाठी योग्य त्या दराले कमिशन दिले जावे. यात निर्धारित काळानंतर योग्य ती वाढ करण्यात यावी.
- बैंक मित्रांच्या नेमणुका भौगोलिक सीमा. खात्यांची संख्या, व्यवहार या निकषावर केल्या जाव्यात.
- बैंक मित्र देत असलेल्या सेवांसाठी जागा. वापरत असलेला डाटा, स्टेशनरी. वाहन खर्च याची भरपाई देण्यात यावी.
- बैंक मित्र करत असलेले कार्यालयीन कामकाज यात कायदेशीर किंवा अर्ध कायदेशीर (QUASI LEGAL) विवाद निर्माण झाले तर त्याचा निपटारा करण्याची जवाबदारी बैंकने घ्यावी.
- बैंक मित्र ते करत असलेल्या कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून पैशांची ने आण कस्तात. यातीत जोखीम लक्षात घेता त्या रकमेचा विमा काढला जावा. यात अपघात अथवा मृत्यू आला तर त्याचाही विमा काढला जाता.
- बैंक मित्रांना पोव्हिडेंट फंड. गॅच्युइटी. पेन्शन या सामाजिक सुरक्षितता योजना लागू करण्यात याव्यात.
- बैंक मित्रांना आदर्श आचार संहिता लागू करण्यात यावी.
- बैंक मित्र, सस्ती म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना बाळंतपणाची रजा, इस्पितळाचा खर्च देण्यात यावा.
- बैंक मित्रांना स्वस्त व्याजदराने व्यवसाय विकसित करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.
या सर्व मागण्या हक्काचे असून एकजुटीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बैंक मित्र असोसिएशन च्या गोंदिया जिल्हा प्रतिनिधी योगेश शहारे यांनी दिला.








