आमगाव विधानसभा रणसंग्रामातून ४ उमेदवार मागे, ९ उमेदवार रिंगणात

प्रा. डॉ. सुजित टेटे, प्रहार टाईम्स

देवरी: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. यामधे आमगाव ६६ विधानसभा क्षेत्रात ९ उमेदवार रिंगणात असून 1) दिलीप जुळा – बहुजन समाज पार्टी 2) राजकुमार पुराम – इंडियन नॅशनल काँग्रेस 3) संजय पूराम – भारतीय जनता पार्टी4) देवीलाल भोगारे – राष्ट्रीय गोंडवाना पार्टी5) निकेश गावड- वंचित बहुजन आघाडी 6) वामन शेळमाके – बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी 7) विलास चाकाटे – अपक्ष 8) यशवंत मलय – अपक्ष 9) शंकर मडावी – अपक्ष

तसेच ४ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली यामधे- दुर्गाप्रशाद कोकोडे, अनिल कुंभरे, वासुदेव घरत, यशवंत ताराम यांचा समावेश आहे.

Share