देवरीत आता ३१ ऑगस्ट ला दहीहंडी स्पर्धाचे आयोजन
देवरी – दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण भारतीय जनता पक्ष तथा युवा मोर्चाच्या वतीने आणि माजी आमदार संजय पुराम व माजी खासदार अशोक नेते यांच्या विशेष सहकार्याने ३१ ऑगस्ट शनिवारला भव्य दहीहंडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सकाळी ११ वाजता अग्रसेन चौकातून दहीहंडी स्पर्धेला सुरुवात होणार असून दुर्गा चौक, कारगील चौक आणि शेवट नगर पंचायतच्या पटांगणावर दहीहंडी फोडोचे कार्यक्रम होणार असून येथेच सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा होणार आहे. प्रमोद संगीडवार, अनिल बिसेन, अनिल येरणे, विजय गहाणे, संजय उईके आणि रितेश अग्रवाल यांच्या कडून प्रत्येकी अकरा हजार एक रुपयांचे एकूण पाच बक्षीस ठेवले असून सोबत आकर्षक शिल्ड सुद्धा देण्यात येणार आहे.
तरी गोविंदा पथकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी इंदरजीतसिंग भाटीया, राजू शाहू , नितेश वालोदे, दिशांत चन्ने, विलास शिंदे, सुशील जैन, दिनेश भेलावे, सोनू चोपकर, माजीद खान, इमरान खान आणि दिपक शाहू यांच्याकडे अधिक माहितीसाठी संपर्क करुन आपापल्या पथकाची नोंद करुन घेण्याचे आवाहन केले असून नागरिकांनी सुद्धा सहपरिवार उपस्थित राहुन दहीहंडी स्पर्धांचा आनंद घेण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.