मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश
देवरी◼️मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी ने उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवली. शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये वर्ग १२वी विज्ञान शाखेचा निकाल 98.63 %लागला . यामध्ये प्राविण्य श्रेणीत 03 प्रथम श्रेणीत 34 द्वितीय श्रेणीत 85 तर पास श्रेणीत 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . यामध्ये विद्यालयातून प्रथम कु. आचल भास्कर बडोले 78.50 % द्वितीय कु. प्रतिक्षा प्रकाश बिंझाडे 78.00% तर तृतीय कु. प्रेरना सुरेश ईरले 76.00 % प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. कला शाखेचा निकाल 90.62 % लागला. प्राविण्य श्रेणीत 04 प्रथम श्रेणीत 30 व द्वितीय श्रेणीत 73 तर पास श्रेणीत 09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . यामध्ये विद्यालयातून प्रथम कु. हिमानी नूरेश जनबंधू 83.33 % द्वितीय हर्षल खूशाल हाडगे 78.69 % तर तृतीय कु. रुपाली इंदल पुजेरी 77.17 % हिमांशू राजकुमार शहारे 76.67 % गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक मा. वासुदेवरावजी गजभिये , संस्थासचिव मा. रामकुमारजी गजभिये, माजी प्राचार्य के. सी. शहारे , प्राचार्य जी. एम. मेश्राम, मुख्याध्यापक व्हि. एस. गेडाम , उपमुख्याध्यापक एस. टी. हलमारे , पर्यवेक्षक डी. एच. ढवळे सर्व प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.