एक नवं पाऊल…..

एक नवं पाऊल उन्नतीचा ध्यास
सुखकर व्हावा कठीण प्रवास!
एक नवं पाऊल नवीन आशा अपेक्षा मनात
नको कोणतीच निराशा सुखी जिवनात!
एक नवं पाऊल संघर्षासी दोन हात कराया
येणाऱ्या संकट संघर्षाला सहज पळवून लावाया!
एक नवं पाऊल उंच क्षितीज गाठण्याचा
उंच उंच भरारी घेत आकाशाला भिडण्याचा!
एक नवं पाऊल सुर्या सारखा तेज चकाकण्याचा
आयुष्यातील असलेलं अंधार दुर सारण्याचा!
एक नवं पाऊल सद्विचार यावा सतत मनात
नको कोणत्याही वाईट प्रवृत्तींना थारा जीवनात!
एक नवं पाऊल ध्येय निश्चित करण्याचा
असलेल्या ध्येयाला लक्ष्या पर्यंत पोहोचविण्याचा!
उमेंद्र युवराज बिसेन
मु-रामाटोला पो-अंजोरा
त-आमगांव जि-गोदिंया (महा)
९६७३९६५३११

Print Friendly, PDF & Email
Share