देवरी: रामनवमी निमित्त मोटार सायकल भव्य रॅलीचे आयोजन

देवरी◼️मॉ धुकेश्वरी तथा सर्व प्रभू श्रीराम भक्त बंधू आणिभगिनींना कळविण्यात येते की, उद्या दि. ३० मार्च गुरुवारला श्रीरामनवमी निमीत्त सकाळी ०८ : ०० वाजता आपल्या देवरी येथील मॉधुकेश्वरी मंदिरातून देवरी नगरात मोटार सायकल भव्य रॅलीचेआयोजन करण्यात आले आहे.यासाठी सर्व भक्त बंधूभगिनींचेसहकार्य अपेक्षित असून सर्वांनी आपापल्या मोटार सायकल किंवास्कूटी घेऊन पूर्व तयारीसाठी सकाळी ०७ : ०० वाजता मॉ धुकेश्वरीमंदिरात उपस्थित रहावे, हीच नम्र विनंती.
यात सकाळी ०७ : ०० वाजेपासून मॉ धुकेश्वरी मंदिरात आलेल्यासर्व भक्तांसाठी फराळ तथा नास्त्याची व्यवस्था केलेली असून भागघेणाऱ्या सर्व भक्तांना नि: शुल्क भगवे फेटे बांधण्यात येतील. तसेचमोटार सायकलला सुद्धा भगवे ध्वज बांधण्यात येतील.
रॅली संपल्यानंतर सर्व भक्तांनी बांधलेले फेटे आणि भगवे ध्वजधुकेश्वरी मंदिरात परत करायचे आहेत.
रॅलीत भाग घेणाऱ्या सर्व पुरुष मंडळींना भगवा कुळता आणि भगवागमचा पोशाख म्हणून अपेक्षित आहेत.
महिला भगिनींना लाल किंवा भगवा पोशाख अपेक्षित आहे. गुरुवारला श्रीराम नवमी निमीत्त सर्व भक्तांनी आपापल्या घरासमोरदीपावली सणासारखी रांगोळी टाकावी. आणि सायंकाळी कमीतकमी ११ दिवे लावावेत.सदर मोटार सायकल भव्य रॅली मॉ धुकेश्वरीमंदिरातून हायवे रोड, राणी दुर्गावती चौक, बाजार गली, दुर्गा चौक, कारगील चौक, पंचशील चौक, सुरभी चौक, श्रीराम मंदिर, पोलिसस्टेशन समोरुन बौद्ध विहार, मस्कऱ्या चौक, पंचशील चौक, गणेशचौक, के. एस. जैन विद्यालय समोरुन हायवे रोड आणि मॉ धुकेश्वरीमंदिरात समाप्त होणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्ट ने दिली आहे.

Share