ब्लॉसम पब्लिक स्कुलमध्ये आनंदमेळा उत्साहात संपन्न

देवरी ◼️स्थानिक ब्लॉसम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून यावेळी आनंदमेळाव्याचे आयोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रिंकू जाधव व वैशाली टेटे, प्राचार्य डॉ. सुजित टेटे उपस्थित होते. फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आनंदमेळा मध्ये 60 विध्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते. पालकांनी मोठ्या संखेने आनंदमेळाव्यात हजेरी लावली होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवाणी यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी अनुभवली. प्रत्येक स्टॉलचे निरीक्षण करून सर्वांना गुणदान करण्यात आले. विद्यार्थी जिवनात व्यावसायीक ज्ञान मिळावे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विभागाचे नितेश लाडे आणि विश्वप्रीत निकोडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. संचालन राहुल मोहुर्ले यांनी केले. आभार वैशाली मोहूरले यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share