उच्च प्राथमिक गटात वंशीका रहांगडाले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम

देवरी◼️तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सीता पब्लिक स्कूल देवरी येथे घेण्यात आली त्यामध्ये सर्व विभागातील जिल्हा परिषद खाजगी शाळांनी सहभाग घेतला. विज्ञान, कृषी, शिक्षण आरोग्य या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण मॉडेल तयार करून विज्ञान प्रदर्शनीत सहभाग नोंदवला आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली येथील स्मार्ट हॉस्पिटल या विज्ञान प्रतिकृतीला तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झालेली आहे. वंशिका चंद्रसेन रहांगडाले वर्ग आठवा या विद्यार्थिनीने व विज्ञान शिक्षिका कुमारी वर्षा वालदे यांनी यांनी सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक दीपक कापसे ,नंदकिशोर शेंडे , दीपक लांजेवार ,तुषार कोवले यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share