देवरीचा मिहीर काशीवार शिष्यवृत्ती परिक्षेत गोंदिया जिल्हात अव्वल

देवरी (प्रहार टाईम्स): महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत देवरीच्या जिल्हापरिषद हायस्कूलचा विद्यार्थी मिहीर काशीवार याने 91.27% घेऊन जिल्हात अव्वल आला आहे. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

मिहीर सध्या नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असून त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्यांचे आई वडील दोन्ही शिक्षकीपेशात आहेत. मिहीर ने आपल्या यशाचे श्रेय आपले आई मनीषा काशीवार, वडील तपेश काशीवार, शिक्षक , कुटुंबिय आणि मार्गदर्शक यांना दिला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share