ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे बालिका दिन उत्साहात साजरा

देवरी 03:- स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, शिक्षिका वैशाली मोहुरले, सरिता थोटे,नामदेव अंबादे , शाळातील शिक्षक मंचावर उपस्थित होते.

प्रमुख अतिथी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली व विद्यार्थांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा गीत व भाषणाद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांच्या कार्यांच्या गूणगौरव केला. कार्यक्रमाला शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी संस्कृति लांजेवार आणि आभार प्रदर्शन मनस्वी सोनुले यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share