पोलीस स्टेशन नवेगाव येथे पोलीस स्थापना दिवस सप्ताह साजरा

नवेगाव ◼️पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री निखील पिंगळे साहेब यांचे आदेशान्वये मा. अपर पोलीस अधिक्षक सोो. गोंदिया श्री अशोक बनकर सा.व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. देवरी श्री देवळेकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली दि. ०२ जानेवारी २०२३ ते ०८ जानेवारी २०२३ रोजी पर्यंत पोलीस स्थापना दिवस सप्ताह साजरा करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे संदर्भात प्राप्त पत्रान्वये पोलीस ठाणे नवेगावबांध अंतर्गत मौजा – नवेगावबांध येथे आज दिनांक ०२/०१/२०२३ रोजी जि.प.कनिष्ठ महाविद्यालय नवेगावबांध येथे पोलीस स्थापना दिवस सप्ताहाचे औचित्य साधुन शालेय विद्यार्थ्यांनी व महीला अत्याचार सबंधाने मार्गदर्शन व व्याख्यान कार्यक्रम आयोजीत करुन शाळेतील विद्यार्थीनी यांना जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा व संरक्षणाचा अधिकाराबाबत माहिती दिली. पोलीस कायदयाची अमंलबजावनी कशी करतात त्यासंबंधाने काय कायदे आहेत, महीला व बालकावर होणा-या अत्याचाराची माहिती न लपविता निर्भयपणे पोलीसांना हेल्प लाईन न. ११२ तसेच पो.स्टे. दुरध्वनी क्रं. ०७१९६-२२८०४१ वर माहिती दयावी आई वडील व शिक्षकांची मदत घ्यावी. तसेच पोलीस काका व पोलीस दिदी संकल्पनेबाबात माहिती देण्यात आली. तसेच बाल न्याय कायदा सन २०१५ बाल मजुर कायदा २०१६ बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६, लैंगिक गुन्हयापासुन मुलाचे संरक्षण कायदा २०१२ याची माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमाला जि.प. कनिष्ठ महाविद्याल येथील मुख्याध्यापक श्री राठोड सर, सहा. शिक्षक श्री मानापुरे सर, व स्टॉप असे शिक्षक व कर्मचारीवृंद आणि २५० ते ३०० विद्यार्थी / विद्यार्थीनी उपस्थित होते. सहा पोलीस निरिक्षक श्री संजय पांढरे सा. पोलीस स्टेशन नवेगावबांध यांनी प्राचार्य राठोड सर यांचे सहकार्य घेवुन शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सोबत स. फो. सयाम / १३६ व पोहवा कोडापे / ९०२, पोशि वाघायें / २२९, हे उपस्थित राहुन सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे संचालन श्री आर डी करचाल सर यांनी केला. तर आभार प्रदर्शन श्री आर. के. खेडकर यांनी ” व्यक्त केला.

Print Friendly, PDF & Email
Share