बालिका दिन साजरा करण्यासाठी जिल्हातील सर्व शाळा सकाळ पाळीत, सविता पुराम यांच्या प्रयत्नाला यश

◼️मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांना निवेदनातून केली होती मागणी

गोंदिया ०२ः सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त गावोगांवी कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु शाळा दुपार पाळीची असल्यामुळे या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षीका व विदयार्थी यांना सहभागी होता येत नाही त्यामुळे दिनांक ३/१/२०२३ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त शाळा सकाळ पाळीची करण्यात यावी अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी जिप गोंदिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी सर्व शाळा सकाळी पाळीत ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share