स.अर्जुनी तालुक्यात शॉर्टसर्कीटमुळे १५ एकरातील ऊस जळून खाक

स.अर्जुनी ४ – गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील मुरपार (लेंडेझरी) येथे काल शेतकऱ्यांचा जवळपास १५ एकर शेतातील ऊस शार्ट सर्कीटमुळे जळाला आहे. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. या घटनेत सात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्युत विभागाने या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक़यातिल मुरपार येथे अचानक चक्री वादळ आले. यात परिसरातील शेतात लोंबकळत असलेल्या विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीची ठिणगी ऊसाच्या शेतात पडली व तिने रौद्र रूप धारण केले. यात १५ एकरातील ऊस जळून खाक झाला. हवा उत्तर दिशेला असल्याने तलावाच्या पाळीपर्यंत ऊस जळत गेला. हवा जर पूर्व दिशेला असती तर शेकडो एकरातील ऊस पीक जळून खाक झाले असते. तसेच, शेतकऱ्यांचे शेती साहित्य देखील नष्ट झाले असते.

खालिल शेतकऱ्यांचे झाले नुकसान:

शेतकरी मनोहर काशिवार, देवेंद्र कापगते, शिवा काशिवार, हेमराज काशिवार, धनराज काशिवार, प्रभुराज काशिवार, भिमराज काशिवार या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला आहे. विद्युत विभागाने नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share