कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद

देवरी:जिल्हा पोलिस विभागातर्फे 31 डिसेंबर रोजी देवरी तालुक्यातील पळसगाव व बोंडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन कम्युनिटी पोलिसंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागातील नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांबद्दल जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे, त्यांच्यातील नक्षल भीती दूर व्हावी, विकास प्रक्रियेला गती मिळावी तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी जिल्हा पोलिस विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातंर्गत 31 डिसेंबर कम्युनिटी पोलिसींग या माध्यमातून पोलिस दलाने चिचगड पोलिस ठाण्यातंर्गत येणार्‍या अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागातील पळसगाव व बोंडे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी विद्यार्थ्यांना नितीमुल्ये व शिस्त, स्वच्छता, सामाजिक विकास तसेच स्पर्धा परीक्षा याबद्दल मार्गदर्शन करुन या परिसरातील शाळांमध्ये शैक्षणिक पूरक वातावरण निर्मितीसाठी पोलिस विभाग सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, पोलिस विभागाद्वारे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शैक्षणिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच शाळांना व्हाईट बोर्ड व मार्कर पेन देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक कुस्तोडे, चनाप, सरपंच धानगाये, पोलिस पाटील पिपरे तसेच शिक्षक उपस्थित होते. आयोजनासाठी चिचगडचे प्रभारी सपोनि शरद पाटील, स.दु.क्षेत्र बोंडेचे प्रभारी पोउपनि राहुल दूधमल व देवरी पोलिसांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share