राष्ट्रवादी देवरी शहर अध्यक्ष मुकेश खरोले यांचा राजीनामा

देवरी: पक्षातील स्थानिक पातळीवर सुरू असणाऱ्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे देवरी शहर अध्यक्ष मुकेश खरोले यानीं देवरी शहर पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा तालुका अध्यक्ष सी. के. बिसेन यांच्या कडे उद्या सकाळी सुपूर्द केला आहे. मागील तीन वर्षापासून देवरी शहर अध्यक्षपदाचे काम प्रामाणिकपणे करताना स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाचा कंटाळा आल्याने राजीनामा देत असल्याचे मुकेश खरोले यांनी सांगितले. तसेच स्थानिक पक्ष नेतृत्वाकडून समूळ काम होत नसल्याचे मत मांडताना पदाला रामराम केल्यानंतर कोनत्याही पक्षात काम करणार नसल्याची भूमिका त्यानीं मांडली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share