थाटात साजरा होणार ब्लॉसम महोत्सव: प्राचार्य डॉ. सुजित टेटे

◼️ब्लॉसम पब्लिक स्कूलमधे पालक सभा संपन्न

देवरी : तालुक्यातील लोकप्रिय आणि अग्रगण्य ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे नुकतिच पालक सभा संपन्न झाली असून यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुजित टेटे उपस्थित होते.

कोरोना काळात शालेय कार्यक्रमांना ब्रेक लागला होता त्यामुळे विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांचा विकास थांबल्यासारखा झालेला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाब्लॉसम पब्लिक स्कूल १४ वे ब्लॉसम महोत्सव २०२३ साजरे करीतअसून नानाविविध सांस्कृतिक कार्यक्रमासह लोकनृत्यांची झलक बघावयास मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शालेय खेळोत्सवाला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकाससह शारीरिक विकास साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती यावेळी दिली.

सदर पालकसभेला पूर्वप्राथमिक वर्गाच्या पालकांनी हजेरी लावली असून शिक्षिका मनीषा काशीवार, कलावती ठाकरे, तनुजा भेलावे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share