भारत राखीव बटालियनने केले 10 हजार वृक्ष लागवड

गोंदिया: वसाहत निर्मितीसाठी वृक्षांची कत्तल होत असल्याचे नेहमीच ऐकवित येते. मात्र वसाहत निर्मितीपूर्वीच वृक्षारोपन केल्याचे उदाहरण निरळच. जवळील बिरसी, परसवाडा परिसरात प्रस्तावित भारत बटालियन क्र. 2 व राज्य पोलिस बल गट क्र. 15 च्या जवानांनी ही बाब करुन दाखविली. तब्बल 10 हजार रोपट्यांचे रोपन करुन त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी सौर उर्जा संयंत्राची उभारणीचे भूमिपूजन 26 डिसेंबर रोजी करण्यात आले.

भारत राखीव बटालियन India Reserve Battalion बिरसी तथा परसवाडा या ग्राम परिसरात प्रस्तावित आहे. ज्यापैकी प्रथम टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून दुसर्‍या टप्प्याकरिता मौजा परसवाडा झिलमिली या शिवारात 26.90 हेक्टर जागेत बांधकाम प्रस्तावित आहे. ही जागा ही गावाशेजारी असून त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे वृक्ष रोपटी नसल्याने भविष्यात परिसरात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने व सामाजिक बांधिलकी जपत भारत राखीव बटालियनच्या जवानांनी या जागेवर दहा हजार वृक्षरोपटी लागवड करून त्याचे संगोपन करण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने वृक्षरोपट्यांना पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता. मात्र, यावर सौरउर्जा संयंत्रद्वारे पाणीपुरवठा करण्याचा तोडगा काढण्यात आला.

सौर ऊर्जा संयंत्र व पाईपलाईन मंजुरीकरिता बटालियन समादेशक विवेक मासाळ जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तसेच बटालियनचे सहाय्यक समादेशक संजय साळुंखे, कैलास पुसाम, मंगेश शेलोटकर, बटालियनचे पोलिस कल्याण अधिकारी सुनील चव्हाण, जवान हंसराज बिसेन, नित्यानंद वाघमारे, जागेश ढेंगे यांनी संबंधितांकडे पाठपुरावा केला. कामाचे महत्व लक्षात घेत जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले व जिपचे उपअभियंता नरेंद्र वानखेडे यांच्या सहकार्याने सौर उर्जा संयंत्रासाठी 5 लक्ष इतका निधी नक्षलग्रस्त भाग विकास कार्यक्रम योजनेतून मंजूर झाला. त्यामुळे आता वृक्षरोपणकरिता पाण्याची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे वृक्षंसवर्धनाला बळ मिळाले असून भारत बटालियन पूर्णत्वास येईपर्यंत हा परिसर हिरवागार पहायला मिळेल, यात शंका नाही.

Print Friendly, PDF & Email
Share