तुषार हर्षे/ प्रहार टाईम्स

लाखनी ४: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शरद साखरवाडे सर उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून अरविंद पेठशिवनीकर सर उपस्थित होते संस्थेचे गटनिदेशक पी. पी. बेतावार सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी प्रशिक्षणार्थ्याला माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्राचार्य मा. रंभाड साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चक्रधर पाखमोडे सर तर आभार प्रदर्शन मनोज गिऱ्हेपुंजे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वि. एम. भोयर सर. अमीन सर. तेजराम बडवाईक सर. श्री कानेकर सर यांनी सहकार्य केले.

Share