ताईकोंडो स्पोर्टस अकॅडेमी देवरीच्या वतीने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ताईकोंडो खेळातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या खेळाडूंना ब्लॅक बेल्ट वितरण करण्यात आले.

प्रहार टाईम्स

गोंदिया 1 – ताईकोंडो स्पोर्टस अकॅडेमी देवरीच्या वतीने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला देवरी येथील आफताब मंगल कार्यालयात गुणवंत खेळाडूचे गुणगौरव करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरी चे तहसिलदार विजय बोरूडे , प्रमुख अतिथि म्हणून पो.स्टे. देवरीचे ठाणेदार अजित कदम , आंतरराष्ट्रीय रेफरी डुळीचंड मेश्राम , माजी नगर उपाध्यक्ष अण्णू शेख , प्राचार्य डॉ. सुजीत टेटे , अमित मेश्राम, पारस कटकवार , शोहिब शेख उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मास्टर बृश ली यांच्या प्रतिमेचे पुजा करून करण्यात आले असून आता पर्यन्त ताईकोंडो खेळातील प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. गौरवण्यात आलेल्या खेळाडूचे नावे खालील प्रमाणे –

ब्लॅक बेल्ट येल्लो बेल्ट रेड बेल्ट
स्वप्नील ठाकरे राजविर नुरूटीतनिष्का बोरूडे
पुरुषोत्तम बागडेआस्था नुरूटी चेतना ठाकरे
वैष्णवी मडावीअविष्का बोरूडे
हिमाणी लांजेवार आभा साखरे ग्रीन बेल्ट
जानवी लांजेवार चेलसी वाल्देगारगी दहिवले
दक्ष गवते क्रिष्टी धुरवे
योजन कावळे श्रावणी हातझाडे
अंतरा ताराम सर्वरी चौधरी
स्मिता तुलावीसाध्य थोटे
ओजस देशमुख
प्रियांनी पटले
गौतमी वासनिक

सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बेल्ट आणि प्रमाणपत्र देवून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. जीवनातील खेळाचे महत्व यावर तहसिलदार विजय बोरूडे यांनी मार्गदर्शन केले असून ठाणेदार अजित कदम यांनी खेळातील भरारी घेतलेल्या खेळाडूच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. सुजीत टेटे यांनी अपयशाला न खचता प्रयत्नातून आपले ध्येय गाठण्याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम बागडे यांनी केले असून आभार प्रदर्शन अमित मेश्राम यांनी मानले , कार्यक्रमाच्या यशासाठी शोहिब शेख , सचिन सचिन बावनकर यांनी मोलाची कामगिरी केले .

Share