स्वदेशी खेळामुळे होतोय शरीराचा विकास: डॉ. नाजुकराव कुंभरे

◼️( १४ ते २० वर्षे वयोगटातील युवकांना मिळाली संधी)
देवरी आपले भारतीय स्वदेशी खेळ कोणतेही असोत ? या सर्व स्वदेशी खेळात चालणे, धावणे, हात फिरवणे आणि उडी घेणे असे विविध क्रिया असल्यामुळे व्यायाम होऊन शरीर सुदृढ आणि निरोगी राहुन शरीराचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन आदिवासी क्षेत्रातील नागरीकांच्या उत्थानासाठी कार्यरत असलेली जनजाती चेतना समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नाजुकजी कुंभरे यांनी केले.
ते देवरी तालुक्यातील कडीकसा येथील आदिवासी विकास राजश्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर १४ ते २० वयोगटातील युवकांसाठी २६ आणि २७ नोव्हेंबरला आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते गिरीधारी कळसाये यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक वसंत खराबे यांनी केले. यावेळी जनजाती चेतना समितीचे जिल्हा उपाध्यक्ष लोकनाथ तितराम, संघाचे विभाग प्रचारक सुजीत कुंभारकर, तालुका विस्तारक रविंद्र आग्रे, तालुका कार्यवाह सुरेश चन्ने, सहकार्यवाह जितेंद्र रहांगडाले सामाजिक कार्यकर्ते बळीराम कुंभरे, संताराम उईके आणि यादोराव सेलोकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कबड्डी स्पर्धेत एकूण ४२ चमुने भाग घेतला होता. यात आदर्श क्लब कटेंगाटोला या चमुने प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय क्रमांक माऊली क्रिडा मंडळ कडीकसा आणि तृतीय क्रमांक आदिवासी नवयुवक क्रिडा मंडळ मिसपिरीने पटकावला आहे. विजयी चमुना बक्षीस वितरण भाजपचे भंडारा – गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख वीरेंद्र अंजनकर, तालुका महामंत्री प्रवीण दहीकर, जनजाती चेतना समितीचे जिल्हा सचिव संजय भावे, सामाजिक कार्यकर्ते दादा कोठे, लक्ष्मण सोनसर्वे, सुरेश गि-हेपुंजे आणि गावकरी मंडळी यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आले.
यशस्वीतेसाठी एन. एस. सेलोकर, धरमसाय कल्लो, शुभम जनबंधू , तुकाराम हलामी, शशीकपूर मडावी, देवराज कुंभरे, भिमराव अंबरवाडे, धनुष जनबंधू , जयपाल कुंभरे, पतिराम होळी, हरिराम कुंभरे, परेश कुंभरे, शुद्धोधन धमगाये, मदन अंबरवाडे, गजानन सेंदूर, अनमोल धमगाये आदींनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share