न्यायासाठी सुरू असलेला लढा आपणच जिंकणार : आ.विनोद अग्रवाल

  • आदिवासी गोवारी शहीद स्मारकाचे भुमिपूजन
  • गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
    गोंदिया : समाजाला विकसीत करण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाशिवाय समाजाची उन्नती होवू शकत नाही. यामुळे गोवारी समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षण देवून उच्चशिक्षित करावे, समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना काही अडी-अडचणी आल्यास मी मदत करण्यासाठी नेहमीच तयार आहे. आज जिल्ह्यातील अनेक गावात आदिवासी गोवारी शहीद स्मारक तयार केले जात आहेत. या शृंखलेत गोंदिया शहरात प्रथमच आदिवासी गोवारी स्मारकाचे बांधकाम होणार आहे. न्यायासाठी ११४ आदिवासी गोवारी बांधव-भगिंनी शहिद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ जावू नये, यासाठी संघटीत होवून लढा उभारा. न्यायासाठी सुरू असलेली गोवारी समाजाची लढाई आपणच जिंकणार, असे प्रतिपादन आ.विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.
    छोटा गोंदिया येथील गोवर्धन चौकात आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी, शहिद स्मारकाचे भुमिपूजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना आ.विनोद अग्रवाल बोलत होते.
    कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जि.प.सदस्य श्रीमती मोहेश्वरी हेमराज नेवारे, समाज संघटनेचे शहर अध्यक्ष सुशिल राऊत, डॉ.शारदा राऊत, संतोष पटले, अनिल शरणागत, डिम्पल तिर्थराज उके, रंजित गौतम, माजी नगरसेवक विनोद पंधरे, कुंदाताई पंचबुध्दे, सुनिल भोयर, अरूण काळसर्पे, गोविंद वाघाडे, बसंत नेवारे, नानु चचाणे, सुरेश नेवारे, सुभाष राऊत, संतोष शहारे, सुनिल सोनवाने, प्रेमलाल शहारे, अशोक सुरज जोशी आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आ.विनोद अग्रवाल, समाज संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत यांच्या हस्ते विधीवत पुजन करून स्मारकाचे भुमिपूजन करण्यात आले. यानंतर गोवारी समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. समाजाच्या विकासासाठी संघटीत होणे गरजेचे आहे. परस्पर मतभेद दूर सारून समाजबांधवानी एकत्रित येवू लढा द्यावा, असे आवाहन समाजाचे अध्यक्ष सुशिल राऊत यांनी केले. कार्यक्रमाला संजय ठाकरे, उमेश कुसराम, ओमकार चचाने, राहुल सोनवाने, कमलेश गाते, आकाश कवरे, शुभम नेवारे, विशाल नेवारे, निशाल नेवारे, नरेश नेवारे, रमेश नेवारे, ओमकार नेवारे, राहुल शहारे, मोनु नेवारे, सुनिल नेवारे, प्रकाश सुरजजोशी, कैलाश नेवारे, शिवनाथ वाघाडे, उमेश राऊत, गोपाल नागोसे, अनिल सरवरे, नानेश्वर राऊत, किशोर राऊत, निखिल वधारे, रमेश सहारे, ईशुलाल कुसराम, दादु सहारे, जगदिश नेवारे, संतोष राऊत सुरज नेवारे, तुषार भोयर, विनोद सोनवाने, मिताराम कोहळे, सुनिल नेवारे, क्रिष्ण सोनवाने, कारू सोनवाने राजेश कवरे आदिंसह गोवारी समाजील महिला-पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Print Friendly, PDF & Email
Share