शिक्षण आणि संस्काराची शिकवण ही भारतीय संविधानातून मिळते- आचार्य श्री हरीभाऊ वेरूळकर गुरुजी

देवरी- मानवी जीवनात महत्वाचे असलेलं शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टींची शिकवण ही भारतीय संविधानातून मिळते फक्त ते अंगीकृत करून भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, न्याय,समता,बंधुता आणि राष्ट्राची एकता असणारी एकात्मता या मूल तत्वांना स्विकारुन भारतीय संविधानात्मक प्राप्त अधिकार या विचारांचे पाईक होणे अर्थातच संविधान दिन साजरा करणे होय असे प्रतिपादन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक,राष्ट्रधर्म प्रचार समितीचे संस्थापक आचार्य श्री हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी नगर पंचायत कार्यालय देवरी आणि दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी द्वारा संचालित सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्र देवरी येथे संविधान दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.एवढेच नाही तर फक्त संविधान दिनाच्या दिवशी भारतीय संविधान मर्यादित न ठेवता प्रत्येक भारतिय नागरिकाने संविधानाचे विचार अंगीकृत करून राष्ट्रविकासात हातभार लावावा असे ही ते पूढे बोलले.डॉ बाबासाहेब आंबेडकर आणी भारतीय संविधान यांना माल्यार्पण करून कार्यक्रम प्रारंभ करण्यात आला.यावेळी विशेष अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून देवरी पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक घाडगे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देवरी येथील पोलीस उप निरीक्षक मंगेश वानखेडे,सेवानिवृत्त प्राध्यापक तेजदासजी मते सर,दयारामजि लांजेवार,मनोजदादा चौबे,संस्थेचे मार्गदर्शक विश्वस्त चेतनदादा उईके,दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार आदि मान्यवर उपस्थितीत होते.दरम्यान प्रमुख मार्गदर्शक घडगे आणि वानखेडे यांनी भारतीय महत्त्व विशद करून स्पर्धा परीक्षेत यश संपादन कस करता येईल त्या करिता सर्वतोपरी कसा प्रयत्न केला पाहिजे की,जेणेकरून आपला ध्येय पूर्ण झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला ध्येयवेढ होऊन यश संपादन करणे गरजेच आहे उपस्थित विध्यार्थ्याना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा संदेश दिला.तर संस्थेचे विश्वस्त चेतन उईके यांनी संविधानात्मक प्राप्त अधिकार आणि त्यामद्ये समाविष्ट असलेल्या कुठल्या कलमांद्वारे प्राप्त हक्क आणि अधिकार याचे महत्त्व पटवून देत आजच्या तरुणांनी भारतीय संविधानाचे वाचन करून त्याचे विचार अंगीकृत करून समाजात वैचारिक क्रांती घडवणं ही काळाची गरज आहे असे मार्गदर्शन केलेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार यांनी तर आभार हर्षवर्धन मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमाच्या आयोजनार्थ संस्थेचे स्वयंसेवक तथा अभ्यासिका केंद्रातील अभ्यासकांनी सहकार्य केलेत.

Print Friendly, PDF & Email
Share