विदर्भात दुसर्‍या दिवशीही गोंदियात निचांकी थंडी

गोंदिया: मागील काही वर्षांपासून जिल्हावासीय निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहे. यंदाही हिवाळा ॠतू सुरु झाल्यानंतरही महिन्याच्या सुरवातीपर्यंत थंडीचा पत्ता नव्हता. मात्र मागील काही दिवसापासून पडलेल्या थंडीने जिल्हावासींना चांगलेच गारठले आहे. आज, 28 नोव्हेंबर रोजी यंदाचे सर्वाधिक निचांकी तापमान नोंदविण्यात आले.

सोमवारी 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून रविवारी 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मागील दोन दिवस विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. दुपारच्या सुमारास तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहत असले तरी सकाळी व सायंकाळनंतर जिल्हावासींना गारठलेल्या थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी महत्वाच्या कामाशिवाय व गरम कपडे घातल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आले. दरम्यान आगामी काही दिवस जिल्ह्यात थंडी वाढण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे, तर बदलत्या वातावरण पाहता आरोग्य सांभाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share