SPCP अंतर्गत विद्यार्थिनीची अप्पर पोलीस अधिक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना भेट

देवरी २४ः विद्यार्थिनींना students police cadets program (SPC) पोलिस दल आधुनिकीकरण अंतर्गत शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्ये रुजवून त्यांना जबाबदार नागरिक बनवणे तसेच spc प्रोग्राम च्या माध्यमातून जनमानसात पोलीस विभागाच्या प्रति सहानुभूती निर्माण करने या उद्देशाने निखिल पिंगळे पोलिस अधीक्षक गोंदिया, यांचे मार्गदर्शनाखाली, अशोक बनकर अप्पर पोलिस अधीक्षक, कॅम्प,(देवरी), यांचे मार्गदर्शनाखाली, दि-24/11/2022 रोजी
अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर , यांनी ‘बाल’ मनावर चांगली नीतिमूल्ये रुजविण्यासाठी व त्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवण्याचा संकल्प करून जीवनात येणार्‍या प्रत्येक संकटावर मात करुन वाटचाल करने व शिक्षणाच्या माध्यमातुन मिळालेल्या संधीचे सोने करून मोठ्या पदावर पोहचण्यासाठी मेहनत करने अभ्यास, शिस्त, अंगी चांगले गुण जोपासणे अशी माहीती देऊन विद्यार्थ्यांशी अनेक विषयवार संवाद साधला.

त्याच बरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली, “उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय देवरी,येथे spc प्रोग्राम अंतर्गत(outdoor) प्रत्यक्ष भेट दिली, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कार्यालयातील कामकाजाची सविस्तरपणे माहिती देऊन, “बाल”मनावर चांगली नीतिमूल्ये रुजवण्यासाठी पोलिस विभागासह शासनाच्या ईतर सर्व विभागनिहाय उपक्रम राबवून उद्याचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पावले उचलण्याची गरज प्रत्येक घटकाने घेणे गरजेचे आहे असे सांगितले.

“यावेळी ठाणेदार पोलिस स्टेशन चीचगड मा. शरद पाटील यांनी विद्यार्थ्यांना 1) विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने राहावे, 2) स्वच्छता, शिस्त, 3)अभ्यासात जिद्द, चिकाटी, व सातत्य, 4)ऑनलाईन फसवणूक, महिला व बालकांची सुरक्षा , 5)पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, अतिवरिष्ठ अधिकारी, यांची माहिती, 6)विद्यार्थिनींनी चूल आणि मूल यामधे न राहता शिक्षणाच्या माध्यमातून स्वताच्या पायावर उभे राहणे, 7)तसेच महिला सशक्तीकरण, इत्यादीबद्दल मार्गदर्शन केले.

Print Friendly, PDF & Email
Share