घरफोडीतील दोन आरोपींना पाच वर्षाचा सश्रम कारावास

गोंदिया: जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्याय दंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी 21 नोव्हेंबर रोजी शहरात घरफोडी (Burglary) करणार्‍या दोन आरोपींना प्रत्येकी 5 वर्ष सश्रम कारावास व 4 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. बबन सुरेश भागडकर (24) रा. मरारटोली व सुनिल सुखनंदन गेंडरे (20) रा. झोपडी मोहल्ला अशी आरोपींची नाव आहे.

शहरातील हेमू कॉलनीतील कन्हैयालाल किशनचंद चंदवानी हे मागील वर्षी मुलीचे लग्नानिमित्त बाहेर गेले होते. या संघीचा लाभ घेत आरोपींनी घरफोडी करून सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकूण 3,14500 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात साक्षपुराव्यावरून (Burglary) आरोपींचा गुन्हा सिद्ध झाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी 21 नोव्हेंबर दोन्ही आरोपींना प्रत्येकी 5 वर्ष कारावास आणि प्रत्येकी 4 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी 3 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

विशेष म्हणजे, यातील आरोपी बबन भागडकर हा घरफोडीचा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात 5 गुन्हे, रामनगर पोलिस ठाण्यात 6 व गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात 1 गुन्हा नोंद आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील, पोहवा जागेश्वर ऊईके, सुबोध बिसेन व पथकाने केला. तर खटल्याचा युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता सुरेश रामटेके तसेच न्यायालयीन कामकाज पोहवा ओमराज जामकाटे, पोशि किरसान यांनी केला.

Print Friendly, PDF & Email
Share