एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल मधील विद्यार्थी विविध स्पर्धेत सहभागी

देवरी 19: महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल मधील विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा स्व. माँ. साहेब मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी नाशिक येथे दिनांक 12 नोव्हेंबर 2022 ते दिनांक 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली होती.
सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंत्री माननीय श्री डाॅ. विजयकुमार गावित साहेब यांच्या हस्ते झाले.

या क्रीडा स्पर्धेमध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल बोरगाव बाजार तालुका देवरी जिल्हा गोंदिया या शाळेतील एकूण 65 विद्यार्थी (34 मुले व 31 मुली) सहभागी झाले होते.
यात विविध प्रकारच्या athletics खेळामध्ये 6 सुवर्ण मेडल, 6 रजत मेडल व 9 कास्य मेडल मिळविले तसेच हँडबॉल मुली या संघाने प्रथम (ट्रॉफी), हँडबॉल मुले हा संघ द्वितीय (ट्रॉफी) व कबड्डी मुले हा संघ द्वितीय (ट्रॉफी) क्रमांक पटकाविला.
याकरिता सर्व विद्यार्थी व क्रीडा शिक्षक श्री. पद्माकर सूर्यवंशी यांचे अभिनंदन माननीय आयुक्त श्री. हिरालाल सोनवणे साहेब, उपायुक्त श्री.अविनाश चव्हाण साहेब, उपायुक्त श्री.माळी साहेब तसेच शिक्षण सल्लागार श्री. कलाथीनाथन सर यांनी पारितोषिक देऊन केले.
एकलव्य बोरगाव बाजार या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये नाव उंचावल्याबद्दल माननीय प्रकल्प अधिकारी, देवरी श्री. विकास राचलवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. हरिश्चंद्र सरियाम, श्री. सोनेवाणे, क्रीडा समन्वयक श्री. मेश्राम, शाळेचे प्राचार्य श्री. संजय बोंतावार तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संजय जाळे व उपाध्यक्ष श्रीमती. मालन नेताम आणि पालक वर्ग सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Print Friendly, PDF & Email
Share