कार्तिक पौर्णिमा महोत्सवनिमित्त विठ्ठल रखुमाई मंदिरात महाप्रसाद

देवरी 10: (प्रा. डॉ. सुजित टेटे ) सार्वजनिक विठ्ठल रखुमाई मंदिर देवरीच्या वतीने कार्तिक पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन 9 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर ला करण्यात आले असून नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी असे निमंत्रण आयोजक सार्वजनिक विठ्ठल रखुमाई मंदिर समितीने केले आहे. कार्तिक पौर्णिमा महोत्सवाची सुरुवात 9 नोव्हेंबर ला 1 वाजता ज्योत प्रज्वलन करण्यात आले असून महोत्सवाची सांगता 10 नोव्हेंबरला गोपाळकाला आणि महाप्रसाद वितरण करून होणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share