गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय अहिंसा दौड स्पर्धेचे आयोजन

गोंदिया : जिल्हयातील युवक- युवती यांच्यातील अष्टपैलू कलागुणांना वाव मिळावा, तसेच जनतेमध्ये पोलीस व प्रशासनाप्रती विश्वासाची आणि आपुलकीची भावना वाढावी या उद्देशाने निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतून व अशोक बनकर अपर पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे १५ नोव्हेंबर २०२२ रोजी वीर बिरसा मुंडा जयंती दिना निमीत्ताने जिल्हास्तरीय अहिंसा दौड Run For Non- Violence मॅराथॉन स्पर्धा १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०५.०० वा. जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली गोंदिया येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

सदर मॅरेथॉन स्पर्धेतील EVENT खालीलप्रमाणे आहेत

– १८ वर्षावरील महिला / पुरुषांकरीता २१ कि.मी.

– १६ वर्षावरील महिला/पुरुषांकरीता १० कि.मी.

– ४५ वर्षावरील महिला / पुरुष (सिनीयर सिटीझन) व आमंत्रित अतिथीकरीता ३ कि.मी. रन ॲण्ड वॉक, 

सदर मैरेथॉन स्पर्धा ही क्रिडा संकुल राजाभोज चौक- रिंग रोड- पतंगा चौक पोलीस मुख्यालय- धिमरटोली- हिरडामाली (कोहमारा रोड) पर्यत या मार्गावर घेण्यात येणार आहे. मैरेथॉन स्पर्धा १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०५:०० वा. पासून ते १०:०० वा. पर्यंत होणे नियोजीत असल्याने आवश्यक सेवा वगळुन इतर वाहनांच्या रहदारी करिता प्रतिबंधित राहिल. मॅरेथॉन स्पर्धेचे नोंदणी फार्म गोंदिया जिल्हयातील एकूण १६ पोलीस स्टेशन स्तरावर उपलब्ध आहेत. नोंदणी करिता अंतिम ०९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. 

मॅरेथॉन स्पर्धेचा STARTING AND FINISHING POINT जिल्हा क्रिडा संकुल, मरारटोली गोंदिया येथे राहील. 

स्पर्धेकरिता नक्षलग्रस्त भागातून येणाऱ्या खेळाडूंची १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी राहण्याची व जेवणाची व्यवस्था जिल्हा क्रिडा संकुल, मरारटोली गोंदिया येथे करण्यात आली आहे. तसेच १५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या सहभागी खेळाडूं करीता पिण्याच्या पाण्याची व फुड पैकेट ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मॅरेथॉन स्पर्धेतील EVENT नुसार प्रथम ते दहाव्या क्रमांकावर येणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षीस व मेडल देण्यात येईल.

१५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या वीर बिरसा मुंडा जयंती दिनानिमीत्ताने अहिंसा दोड Run For Non- Violence मॅराथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share