आनंद तुमचा माझा, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांची शाळा भेट..

आनंद तुमचा माझा,
किती छान तीन शब्दांच वाक्य. पण आयुष्याचा सार सामावलेले वाक्य. ठिकाण आश्रम शाळा धाबेपवनी. निमित्त होते उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी उपविभाग संकेत देवळेकर यांची शाळा भेट.


साहेब म्हणजे आपल्या कर्तव्या सोबत सामाजिक बांधिलकी कशी जपावी याचं मूर्तीमंत उदाहरण. आश्रम शाळेमध्ये खावू वाटपाच्या निमित्ताने आणि संवाद साधण्याच्या निमित्ताने आम्ही शाळेमध्ये गेलो. शाळेतील शिक्षकांनी सुद्धा छान कार्यक्रमाची व्यवस्था केली होती. साहेबांनी माईक हाती घेतला की समोर कितीही समुदाय असो अगदी मंत्रमुग्ध होतो हे मी यापूर्वीच्या कार्यक्रमा मध्ये अनुभवले आहे. पण आज परिस्थिती वेगळी होती.
कारण की समोर इयत्ता पहिलीत शिकणारा आणि इयत्ता 10 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी सगळे समोर होते. जनसमुदाय 250 आणि तो ही विभिन्न वयोगटातील. काही बाराखडी शिकणारे आणि काही करियर चा पहिला टप्पा पार करणारे. साहेब प्रमुख पाहुणे होते, पण साहेबांची परीक्षा असल्यासारखे चित्र होते.
पण काहीच वेळां मध्ये हे चित्र बदलून गेले. साहेबांनी आनंद तुमचा आनंद माझा या स्लोगन खाली सुर वात केली. मुलांना त्यांचे स्वतःचे नाव जोरात म्हणायला लावणे. मोठमोठ्याने हसणे अश्या विविध कृती करायला लावल्या. आणि पाहता पाहता मुले आणि साहेब यांच्यामध्ये एक जुगलबंदी सुरू झाली आणि सारा माहोल मंत्रमुग्ध झाला. शेवटी मुलांना बिस्कीट पुडे वाटण्यात आले.


ज्याने कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुलांचे चेहरे आणि कार्यक्रम संपलेवर मुलांचे चेहरे यामधील फरकाचे निरीक्षण केले असेल त्याला हे नक्कीच जाणवले असेल. मी केले होते मला जाणवले ज्या चेहऱ्यावर काळजी, कंटाळा, विचार असे भाव होते ते चेहरे 5 ते 10 मिनिटामध्ये आनंदी आणि समाधानी झालेले होते.
सलाम साहेबांना…

Print Friendly, PDF & Email
Share