शिकारीसाठी शेतात लावलेल्या इलेक्ट्रिक करंटचा शॉक लागून दोघांचा मृत्यू

देवरी: शिकारीसाठी शेतातील लोखंडी तारेला इलेक्ट्रीक करंट देण्यात आला होता. या तारेचा शॉक लागून दोन तरूणांचा म्रुत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.०५ नोव्हेंबर) रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास देवरी शहरालगद असलेल्या मोठा परसटोला परिसरात घडली आहे.
या घटनेत आशिष कोसरे वय २६ वर्ष, अनमोल गायकवाड वय २२ वर्षे दोघेही राहनार परसटोला (देवरी) असे म्रुत्यू झालेल्या तरूणांचे नाव आहे. याप्रकरणी देवरी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करन्यात आली आहे. सुत्रानीं दिलेल्या माहितीनुसार , शेतात शिकार करण्यासाठी लोखंडी तारेला इले्ट्रीक करंट दिला होता. रात्री शेतात गेलेल्या या दोघानां त्या तारेचा शॉक लागून त्यांचा म्रत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दिनांक ०५/११/२०२२ चे २३:३० वा. दरम्यान यातील फिर्यादी मनोहर रूपसिंग कुंजाम, वय २२ वर्षे रा. परसटोला (देवरी) ता. देवरी, हा आपल्या पाच मित्रासह मिळुन देवरी येथील एम.आय.डी.सी. जवळील बंद असलेल्या जि.प शाळेची लोखंडी गेट आणत असतांनी एम. आय. डी. सी. लगतचे जंगलात परसटोला पहाडीजवळ अज्ञात आरोपीचे विदयुत तारावर लावलेल्या विदयुत करंटमुळे मानवी जिवीत हाणी होवुन मृत्युस कारणीभुत होण्याचा संभव आहे याची जाणीव असुन सुध्दा अज्ञात आरोपीने वरिल कृत्य करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करून मृतक अनमोल गायकवाड व आशिष कोसरे यांचे मृत्युस व शाम भारती यास जखमी होण्यास कारणीभुत झाल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे देवरी येथे अप क. ३१२/२०२२ कलम ३०४, ३३६, ३३७ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि आनंदराव घाडगे पोस्टे देवरी हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share