७ ते २० नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात आगमन होणा-या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा: आमदार कोरोटे

देवरी : देशात व राज्यात भाजप ही इंग्रजांची फोडा व राज्य करा ही नीती वापरत असून जात, धर्म आणी भाषेच्या नावावंर समाजामध्मे व्देष पसरविण्याचे काम सुरू आहे. सातत्याने राज्य घटनेची पायमल्ली केल्या जात आहे. हे रोखण्यासाठी आणी भारतीय राज्य घटनेच्या संरक्षणाकरीता कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेचे सोमवार ७ नोव्हेंबर पासून २० नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात आगमन होत आहे.तरी गोंदिया जिल्ह्यासह आमगावं -देवरी विधानसभा क्षेत्रातील कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले आहे.
सविस्तर असे की, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचे ७ नोव्हेंबर पासून २० नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात आगमन होत असून ही यात्रा महाराष्ट्रात ३८२ कि.मी.चा प्रवास करणार आहे. ही यात्रा ७ ते ११ नोव्हेंबर पर्यंत नांदेड जिल्हा तर ११ ते १५ नोव्हेंबर पर्यंत हिंगोली जिल्हा आणी १५ ते १६ नोव्हेंबर पर्यंत वाशिम जिल्हा व १६ ते १८ नोव्हेंबर पर्यंत अकोला जिल्हा तसेच १८ ते २० नोव्हेंबर पर्यंत बुलढाणा जिल्ह्यात फिरणार आहे.
या दरम्यान नांदेड व शेगाव येथे जाहिर सभेचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे. तरी आयोजीत केलेल्या भारत जोडो यात्रेत व जाहिर सभेत गोंदिया जिल्ह्यासह आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्रातील कांग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share