घरफोडी चोरी मधील 2 आरोपींना अर्जुनी मोर पोलिसांनी अटक करून 44,500 रु. चा सर्व माल केला हस्तगत

अर्जुनी मोर : शहरातील चिंतेश्वर सदाशिव लंजे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू होते. दि.25/10/2022 ते दि.01/11/2022 दरम्यान दिवाळीच्या सुट्टीला ते गावी गेल्यानंतर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या नविन घराचे बांधकामवरील एका खोलीचा ताला तोडुन 1) लोखंडी ऍगल पाईप मोठे 2.5 बाय 1 ईंचचे 10 नग किमत 28000/- रु 2) लोखंडी ऍगल पाईप लहान 1 बाय 1 ईंचचे तीन बंडल किमती 16500/रु चा माल असे एकुण 44,500/- रु. चे साहित्य चोरून नेले.

घरफोडी चोरीची तक्रार दि. 01/11/2022 रोजी प्राप्त होताच अर्जुनी मोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम यांनी 249/2022 कलम – 457, 454, 380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला.

अर्जुनी मोर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांमध्ये दोन आरोपी 1) योगेश घनश्याम डोंगरवार वय 21 वर्ष रा. अर्जुनी मोरगाव 2) अन्वेष चंद्रशेखर सोनवणे वय 23 वर्ष रा. अर्जुनी मोरगाव यांना अटक केली.अटक आरोपींकडे कसून तपास करून चोरी केलेला सर्व मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आलेली आहे.

दोन्ही आरोपींविरोधात सक्षम पुरावा गोळा करून मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अर्जुनी मोर यांच्या न्यायालयात 24 तासाच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी मोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम, परि. पोउपनि. संतोष गुट्टे, पोहवा रोशन गोंडाने, पोना. रमेश सेलोकर, पोना. राहुल चिचमलकर, पोशि.श्रीकांत मेश्राम, पोशि. गौरीशंकर कोरे, पो. ना. विजय कोठांगले, सायबर सेल गोंदियाचे पोलीस नाईक दीक्षित दमाहे यांनी केलेला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share