श्वान पथक,गोंदिया, श्वान जॅक मार्फत घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध व आरोपीस अटक

आमगाव ०३ः प्रकरण अशा प्रकारे आहे की, आज दिनांक 03/11/2022 रोजी नियंत्रण कक्ष, गोंदिया यांनी दूरध्वनीव्दारे कळविले की, पो. ठाणे आमगाव येथे फिर्यादी नामे – प्रशांत असाटी रा नारायण नगर आमगाव यांचे येथे घरफोडी झाल्याबाबत कळविल्याने श्वान पथक चे पो. उप. नि. कुळमेथे टीम व श्वान जॅक सह घटनास्थळ आमगाव करिता रवाना झाले. घटनास्थळी पो. नि. आमगाव श्री हांडे यांना भेटून त्यांचे व फिर्यादी समक्ष घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असता घटनास्थळ प्रशांत असाटी रा नारायण नगर आमगाव यांचे राहते घरी भगवा गमछा व ग्लोज अशा वस्तू दिसून आल्या सदर वस्तूंचा श्वान जॅक यास वास देण्यात आला असता श्वान जॅक वास घेत घेत गेट मधून आमगाव गोंदिया रोडवर येऊन रोडच्या बाजूला असलेल्या निळ्या रंगाच्या लोखंडी पाण्याची टपरी मागे अंधारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अज्ञात इसमा जवळ जावून श्वान जॅक भुंकू लागला त्या इसम ची पाहणी केली असता त्याच्या डाव्या पायाला मोठी जखम व रक्त निघत असल्याचे दिसून आले. सदर इसमास तपासी अधिकारी पो. नि. हांडे व पो स्टाफ नी औषोधोपचार कामी ग्रामीण रुग्णालय येथे नेवून औषोधोपचार केले. सदर इसम हा शुध्दीवर आल्यावर त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव राजेश सुखलाल विश्वकर्मा वय 24 वर्षे रा. भाजिडोगरी ता. सालेवरा जि. खैरागड (छ. ग.) असे सांगीतले. विश्वासात घेऊन प्रशांत असाटी रा नारायण नगर आमगाव येथे झालेल्या चोरी बाबत अधिक विचारपूस केली असता सदर ठिकाणी त्यांनी स्वतः चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. पुढील कारवाई तपासी अधिकारी पो. नि. हांडे,पो. स्टे. आमगाव हे करीत आहेत. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे सर यांनी श्वान जॅक, व श्वान पथक गोंदिया यांनी केलेल्या उत्तम कामगिरी बदल अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share