देवरी येथे आमदार कोरोटे यांच्यातर्फे दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन

देवरी,ता.३०: आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्यातर्फे शनीवार(ता.२९ आक्टोंबर ) रोजी येथील माँ धुकेश्वरी मंदिराच्या सभग्रुहात कांग्रेस पक्षातील नेते मंडळी, लोकप्रतिनीधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रमंडळी, शुभचिंतक व देवरी तालुका क्षेत्रातील आणी देवरी शहरातील जनते करीता दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार सहषराम कोरोटे हे होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस चे महासचिव विनोद जैन, गोंदिया जिल्हा महिला कांग्रेस चे अध्यक्ष वंदनाताई काळे, गोंदिया शहर कांग्रेसचे अध्यक्ष जहिरभाई, देवरी तालुका कांग्रेसचे अध्यक्ष संदिप भाटिया, देवरी तालुका महिला कांग्रेस चे अध्यक्ष सुनंदाताई बहेकार, आमदार कोरोटे यांच्या धर्मपत्नी सिमाताई कोरोटे, जि.प.सदस्य राधिकाताई धरमगुळे, पं.स.सदस्य प्रल्हाद सलामे, रंजित कासम, भारतीताई सलामे, अनुसयाताई सलामे, गोंदिया जिल्हा कांग्रेस चे महसचिव राजू काळे, बळीराम कोटवार, देवरी शहर कांग्रेस अध्यक्ष कुलदिप गुप्ता, गोंदिया तालुका युवक कांग्रेस अध्यक्ष सुमीत शेंडे, सरपंच कविताताई वालदे, सोनू नेताम, सौ. गंगासागर, कमलेश नंदेश्वर, माजी पं.स.सदस्य रामेश्वर बहेकार, उत्तम मरकाम, आदिवासी सहकारी संस्थेचे मानीकबापू आचले, भुवन नरवरे, माजी सरपंच नुतन बंसोड, कांग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता द्वारकाप्रसाद धरमगुळे, चैनसिंग मडावी, संदिप कटकवार, ब्रिजलाल सोनबल, युवक कांग्रेसचे वैभव जैन, अमित तरजुले, सचिन मेळे, नरेश राऊत, छगनलाल मुंगणकर, महिला कार्यकर्ता सुषमाताई वैद्ये, साईन सय्यद यांच्यासह देवरी तालुका व शहर कांग्रेस चे सर्व पदाधिकारी, कार्तकर्ते आणी ग्रामीण ,शहरी भागातील जनता बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी कांग्रेस पक्षातर्फे या क्षेत्राचे कवि सुदर्शन लांडेकर यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर नावलौकिक केल्याबद्दल आमदार कोरोटे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणी पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक तालुकाध्यक्ष संदिप भाटिया यांनी तर अविनाश टेंभरे यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

Print Friendly, PDF & Email
Share