तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप झालं डाऊन, ग्रुप्सवर मेसेजिंग थांबलं!

जगभरातल्या युजर्सकडून ट्विटरवर यासंदर्भात ट्वीट्स केले जात आहेत

जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नसून फक्त पर्सनल चॅटची सुविधा युजर्सला वापरता येत नसल्याचं समोर आलं आहे.

सर्व्हरमध्ये बिघाड?

दरम्यान, गेल्या अर्ध्या तासापासून व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅपकडून अद्याप अधिकृत माहिती दिली नसल्यामुळे हा बिघाड नेमका कधीपर्यंत दुरुस्त होईल? याबाबत नेटिझन्स ट्विटरवर विचारणा करू लागले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share