शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ गैरप्रकारात समाविष्ट परिक्षार्थींची यादी प्रसिध्द

प्रतिनिधी / भंडारा : सन 2018 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गुरनं 58/2021 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयाच्या तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता त्या असे निष्पन्न झाले की, 1663 उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केले आहे. प्रत्यक्षात ते अपात्र असतांना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतले.
शिक्षक पात्रता परीक्षा 2018 चा अंतिम निकाल 12 ऑक्टोंबर 2018 रोजी परीक्षा परिषदच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला त्यानुसार एकूण 9677 उमेदवार पात्र ठरले होते, त्यापैकी 779 उमेदवार प्रत्यक्ष अपात्र असतांना त्यांच्या गुणामध्ये फेरफार करुन पात्र घोषित केले असल्याने ते गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच 884 उमेदवारांनी आरोपींच्या संगनमताने बनावट प्रमाणपत्र गुणपत्रक प्राप्त करून घेतले आहे.
गैरप्रकारमध्ये समाविष्ट परीक्षार्थी उमेदवार यांचे विरुद्ध परीक्षा परिषदेने शास्ती निश्चित केलेली आहे सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share