स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रहार टाईम्स

नागपुर 26- हिंगणा येथील नागलवाडी येथे मांग गारुडी समाजाच्या छोट्या वस्तीतील मुलांना अटल बिहारी वाजपेयी जयंती निमित्याने रजिस्टर,पेन,पेन्सिल,खोडरबर चॉकलेट आणि बिस्किटाच्या वाटप करण्यात आला तसेच लहान मुलांना निबंध स्पर्धेचे बक्षीस सुद्धा देण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून अभय सर ठवकर (मॅनेजर FSC गुमगाव), प्रणव सर तभाने (इन्चार्ज FSC गुमगाव) , विराज सर झाडे, आदित्य सर मुखेडकर, राम सर बंग (जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नागपूर ग्रामीण), शरूताई निमजे (महिला अध्यक्ष:- श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूर) यांच्या उपस्थितीत पार पडले असून स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप, मदतीचा हात देत समाजाला संदेश देण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share