चिचगड : हत्या करुन कमरलेला मोठा दगड बांधुन नाल्याच्या पाण्यात फेकणाऱ्या आरोपीला ४ तासात अटक

◼️अनैतिक संबंधातून इसमाची कुऱ्हाडीने हत्या

देवरी 20: दिनांक १७/०९/२०२२ रोजी फिर्यादी नामे सौ. पुष्पाताई दिलीप अरकरा वय २६ वर्षे रा. तुमडीमेंढा ता. देवरी जि. गोंदिया हिने पोस्टे ला येवुन रिपोर्ट दिली की, तिचा पती नामे दिलीप संतराम अरकरा वय ३५ वर्षे रा. तुमडीमेंढा ता. देवरी जि. गोंदिया हा घरुन गुम झाल्याबाबत तक्रार दिल्याने पोस्टे ला गुम क्रमांक १४/२०२२ हा दाखल करुन चौकशी सुरु केली. दिनांक १९/०९/२०२२ रोजी फिर्यादी हिने पोस्टे ला येवुन माहीती दिली की, मौजा तुमडीमेंढा शेतशिवारा जवळील जंगल भागातील नाल्याजवळ तिचे गुम पती हे मृत अवस्थेत दिसुन आल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोस्टे ला मर्ग क्रमांक १४/२०२२ कलम १७४ जा.फौ. प्रमाणे दाखल करण्यात आला. सदर मर्ग चे तपासात मृतक इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने हत्याराने वार करुन मारुन त्याच्या कमरलेला मोठा दगड बांधुन नाल्याच्या पाण्यात फेकुन दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर मर्ग वरुन पोलीस स्टेशनला सौ. पुष्पाताई दिलीप अरकरा यांचे तोंडी रिपोर्ट वरुन अपराध क्रमांक २६०/२०२२ कलम- ३०२, २०१ भा. दं. वि. चा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्हयाचे तपासात संशयीत इसम नामे रतिराम दशरथ कुंभरे वय ४२ वर्षे यास ताब्यात घेवुन त्याचे कडे केलेल्या चौकशीत मृतक याचे रतिराम कुंभरे याचे पत्नीसोबत अनैतीक संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपी १) रतिराम दशरथ कुंभरे यांनी आरोपी क्रमांक २) छेदीलाल कारुजी आचले ३) मोतीराम पांडुरंग नेताम सर्व रा. तुमडीमेंढा यांचे मदतीने कु-हाडीने सपासप वार करुन त्यास जिवानीशी ठार करुन प्रेताच्या कमरेला साडीला दगड बांधुन नाल्याच्या पाण्यात फेकुन दिल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद तिन्ही आरोपीतांना दिनांक १९/०९/२०२२ चे २३.५७ वा. रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आले.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक , विश्व पानसरे , अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, भिसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , स्थागुशा गोंदिया, बबन आव्हाड, चिचगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. शरद पाटील, पो.उप.नि. मनोहर ईस्कापे, स.फौ. हुर्रे, पो.हवा. मसराम, पो.हवा. पदमे, पो.हवा. अंबुले, पो.हवा. गायकवाड, पो.ना. सुधाकर शहारे, पो.ना. कमलेश शहारे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स. पो. नि. शरद पाटील हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share