धुळीमुळे देवरी-आमगाव मार्ग बनले जीवघेणे

प्रहार टाईम्स

नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालू नका तात्काळ योग्य उपाययोजना करा- माजी जि प सदस्य दीपक पवार यांची ताकीद

लोहारा 22: देवरी ते आमगांव सिमेंट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे बांधकाम सध्या स्थितीत सुरू आहे. लोहारा/सुरतोली बस स्टॉप वर मागील ३ वर्षा पासून धुळीचा सम्राज पसरला आहे. मात्र या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नाही‌‌. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्याच्या नाकातोंडात धूर जात आहे. रोडालगतच्या घरातील लोकांना धुळीच्या सामना करावा लागत असून याच ठिकाणी बस स्टॉप आहे. दररोज कितीतरी लोक या ठिकाणाहून ये- जा करतात स्थानिक लोक या त्रासाला कंटाळून गेले आहेत याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे.


या रस्त्यावर मोठ्या वाहनांची रहदारी असल्यामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले दिसून येते. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना समोरून मागून येणारे वाहन दिसत नाही व हा सगळा प्रकार मुख्य बस स्टॉप वर आहे त्यामुळे एखादे मोठे अपघात घडू शकते या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.

या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नसून रस्त्यावर धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे या रस्त्यावर दिवस रात्र प्रचंड वाहतूक असते. या उखडलेल्या रस्त्यांची काळजी घेणे संबंधित विभागाचे कर्तव्य आहे मात्र तसे दिसत नाही.रस्त्या लगतच्या लोकांना श्वसनाच्या आजारात वाढ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

या रस्त्याचे बांधकाम मंदगतीने सुरू असून याकडे संबंधित विभागाने जातीने लक्ष घालून मोठ्या प्रमाणात धुळी मुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होणार की नाही याकडे सर्व लोहारा/सुरतोली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

याविषयी प्रहार टाईम्स च्या प्रतिनिधींनी क्षेत्रातील माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्याशी संपर्क केला तेव्हा दीपक पवार यांनी संबंधित विभागाच्या लोकांना नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका तात्काळ समस्या मार्गी लावण्याचे ताकीद दिल्याचे समजते.

Print Friendly, PDF & Email
Share