नगरसेवकांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी

◼️ अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्यानां दिला नगरसेवकांनी धीर

देवरी 10: मुसळधार पाऊसाचा फटका गोंदिया जिल्हात बसला असून आताही पाऊस सुरूच आहे. अतिवृष्टी मुळे गोंदिया प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

अतिवृष्टीमुळे देवरी नगरपंचायत च्या प्रभाग क्रमांक 11 येथील पाच घरांचे नुकसान झाले असून भिंती पडल्या त्याची पाहणी नगरसेवकांनी केली आहे.

यामध्ये नगराध्यक्ष संजू उईके , शिक्षण सभापती संजय दरवडे बांधकाम सभापती रितेश अग्रवाल , नगरपंचायतीचे अधिकारी श्री आचले , तलाठी गजबे यावेळी उपस्थित होते. नुकसानग्रस्त लोकांना धीर देत नगरपंचायत नेहमी सहकार्य करणार असे आश्वासन यावेळी नगरसेवकांनी दिले.

Print Friendly, PDF & Email
Share